EV vehicle Loan by SBI : सध्या, इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे आणि पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या काळात पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व वाढलेले आहे. विविध कंपन्यांकडून सध्या इलेक्ट्रिक दुचाकी आणि कार मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात आहेत आणि ग्राहक या वाहनांना अधिक पसंती देताना सुद्धा दिसत आहेत.
याव्यतिरिक्त, इलेक्ट्रिक कारचा वापर जास्तीत जास्त वाढवण्याचा सरकार देसखील प्रयत्न करत आहे. या इलेक्ट्रिक वाहनांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी सरकारी बँकेमार्फत चांगले कर्ज सुद्धा मिळत आहे.
SBI EV vehicle Loan in Marathi इलेक्ट्रिक गाडी कर्ज
श्रेणी | उत्पन्न पात्रता | कर्जाची रक्कम |
केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे नियमित कर्मचारी (महाराणा/नवरत्न/ मिनीरत्न). डिफेन्स सॅलरी पॅकेज (डीएसपी), पॅरा मिलिटरी सॅलरी पॅकेज (पीएमएसपी) आणि इंडियन कोस्टल गार्ड पॅकेज (आयजीएसपी) ग्राहक आणि विविध संरक्षण आस्थापनांचे शॉर्ट कमिशन्ड अधिकारी | अर्जदार आणि/किंवा सह-अर्जदार यांचे निव्वळ वार्षिक उत्पन्न जर असेल तर, एकत्रितपणे किमान रु. ३,००,०००/- | मासिक उत्पन्नाच्या 48 पट |
व्यावसायिक, स्वयंरोजगार, व्यापारी, मालकी/भागीदारी फर्म | नफा किंवा एकूण करपात्र उत्पन्न रु. ३,००,०००/- | 4 पट निव्वळ नफा किंवा एकूण करपात्र उत्पन्न ITR नुसार घसारा परत जोडल्यानंतर आणि सर्व विद्यमान कर्जांची परतफेड |
शेती किंवा शेती संबंधित कामे करणारे लोक | अर्जदार आणि/किंवा सह अर्जदार यांचे वार्षिक उत्पन्न एकत्रितपणे किमान रु. ४,००,०००/- | निव्वळ वार्षिक उत्पन्नाच्या 3 पट |
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक मस्त कर्ज योजना सुरु केला आहे, हि कर्ज योजना विशिष्ट इलेक्ट्रिक कार मॉडेल्ससाठी 100% कर्जाचा पर्याय उपलब्ध करून देते.
तुम्हाला कोणत्याही डाउन पेमेंटशिवाय नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त, निवडक मॉडेल्ससाठी ऑन-रोड किमतीच्या 90% पर्यंत कर्ज ऑफर सुरु आहे.
पात्रता आणि व्याजदर SBI EV vehicle Loan Eligibility & Interest Rates
मासिक उत्पन्नाच्या आधारे व्यक्ती विविध प्रकारच्या कर्जासाठी पात्र असणार आहेत. उदाहरणार्थ, तीन लाख रुपये किमान वार्षिक पगार मिळवणारे सरकारी कर्मचारी त्यांच्या मासिक पगाराच्या चार पट कर्जासाठी पात्र ठरू शकतात.
शिवाय, ज्या ग्राहकांचे उत्पन्नाचे प्राथमिक स्त्रोत शेती आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये आहे अशा स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती आणि व्यवसाय मालकांसह त्यांच्या आयटीआरमध्ये नमूद केलेल्या एकूण करपात्र रकमेच्या चौपट किंवा निव्वळ रक्कम कर्ज प्राप्त करण्यास पात्र असतील.
स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑफर केलेल्या विशेष कर्ज योजनेतून मिळवलेल्या कर्जाचा परतफेड कालावधी तीन ते आठ वर्षांचा असतो, ज्यावर मानक वाहनांसाठी 8.85 ते 9.80% व्याजदर असेल.
इलेक्ट्रिक कारसाठी व्याजदर 8.75 ते 9.45% पर्यंत आहे. यावरून आपल्याला समजते कि स्टेट बँक ऑफ इंडिया इलेक्ट्रिक कारसाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरावर 0.25% पर्यंत सूट देत आहे.
आवश्यक कागदपत्र Documents Required for SBI EV vehicle Loan
- पगारदार व्यक्तीसाठी आवश्यक कागदपत्र :
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- 2 पासपोर्ट आकाराची फोटोस
- ओळखीचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा
- पगार पॅकेज असलेले ग्राहक ज्यांनी त्यांचे पगार खाते किमान 12 महिने जुने असावे
- मागील 2 वर्षांचे आयटी रिटर्न
- पगारदार/व्यावसायिक व्यक्तींसाठी आवश्यक कागदपत्र :
- मागील 6 महिन्यांचे बँक खात्याचे स्टेटमेंट
- 2 पासपोर्ट साइज फोटो
- ओळखीचा पुरावा
- पत्ता पुरावा
- उत्पन्नाचा पुरावा: मागील 2 वर्षांसाठी आयटीआर
- मागील 2 वर्षांसाठी आयटी रिटर्न किंवा फॉर्म 16
- लेखापरीक्षित ताळेबंद, 2 वर्षांचे P&L विवरण, दुकान आणि आस्थापना कायदा प्रमाणपत्र / विक्रीकर प्रमाणपत्र / SSI नोंदणीकृत प्रमाणपत्र / भागीदारीची प्रत
- शेती आणि शेती संबंधी कामे करणाऱ्या व्यक्ती :
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- 2 पासपोर्ट साइज फोटो
- ओळखीचा पुरावा
- पत्ता पुरावा
- पीक लागवड
- सर्व जमीन फ्री होल्ड आधारावर असावी आणि मालकीचा पुरावा कर्जदाराच्या नावावर असावा
अर्ज कसा आणि कुठे करावा? SBI EV vehicle Loan Online Form
खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही ह्या कर्जासाठी अर्ज करू शकता.
- सर्वात आधी तुम्हाला sbi च्या ऑफिसिअल अकाउंट वर जाऊन कर्ज विभागात जायचे आहे.
- त्यांनतर तुम्हाला तिथे काही कर्ज कॅटेगरी दिसतील.
- त्यातील EV कर्ज या कॅटेगरीत जाऊन तुम्हाला अर्ज करा या पर्यायावर क्लीक करावे लागेल.
- त्यांनतर तुम्हाला एक नवीन पेजवर पाठवण्यात येईल.
- या पेजवर तुम्हाला विचारलेली माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे.
- त्यांनतर तुम्हाला कर्ज मंजुरीबाबत बँकेकडून कळवण्यात येईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया | अधिकृत वेबसाईट |
सर्व कर्जांविषयी सविस्तर माहिती मिळवा | होम पेज |
इलेक्ट्रिक गाडीच्या कर्जावर SBI किती व्याज घेते?
इलेक्ट्रिक कारसाठी व्याजदर 8.75 ते 9.45% पर्यंत आहे. यावरून आपल्याला समजते कि स्टेट बँक ऑफ इंडिया इलेक्ट्रिक कारसाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरावर 0.25% पर्यंत सूट देत आहे.