PM Mudra Loan Yojana: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील भारतात राहत असाल आणि तुम्हालाही एक नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर, आता सरकार बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी एक नवीन योजना राबवत आहे. त्याचप्रमाणे, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी सरकारने एक कर्ज योजना देखील सुरू केली आहे. ज्यामध्ये तुम्हाला दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अगदी सहजतेने उपलब्ध करून दिले जाते. तर तुम्हाला हे कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे पूर्तता करावी लागतील, कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अगदी सहजतेने तुम्ही हे कर्ज मिळवून तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तर आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा, या योजनेची पात्रता काय आहे, तसेच या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. म्हणून हा लेख संपूर्ण वाचा.
PM Mudra Loan Yojana 2024 In Marathi
तर मित्रांनो, केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे बेरोजगार तरुण जर स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असतील, तर सरकारकडून त्यांना कर्ज देऊन मदत केली जाते. अशा इच्छुक लोकांना सरकार 50 हजार रुपये ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देते.
सरकारने दिलेल्या कर्जावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तर आता तुम्हाला देखील या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या जवळील बँकेच्या शाखेला भेट देऊन या योजनेसाठी अगदी सहजरित्या अर्ज करू शकता. पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत मिळालेल्या कर्जावरील व्याज हे रकमेच्या आधारावर भरावे लागते. ज्यामध्ये अर्जदारांना दहा टक्के ते बारा टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागते.
पीएम मुद्रा कर्ज योजनेचे प्रकार
तर मित्रांनो, प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सरकार लाभार्थ्यांना तीन प्रकारची कर्जे देते. यामध्ये शिशु, किशोर आणि तरुण कर्जे समाविष्ट आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सरकार शिशु कर्जासाठी 50 हजार रुपयांपर्यंत, किशोर कर्जासाठी 50 हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत आणि तरुण कर्जासाठी पाच लाख रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध करून देते.
पीएम मुद्रा कर्ज योजनेसाठी पात्रता
- पीएम मुद्रा कर्ज योजनेचा लाभ मूळ भारतीय नागरिक असलेल्या अर्जदारांना दिला जाईल.
- १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींनाच याचा लाभ मिळेल.
- जर अर्जदाराला कोणत्याही बँकेने कर्ज फेडण्यास अपात्र घोषित केले असेल तर त्याला लाभ मिळणार नाही.
- एखाद्या व्यक्तीला कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल, तर त्याला त्या व्यवसायाची पूर्ण माहिती असली पाहिजे.
- याशिवाय अर्जदाराकडे आधार कार्ड, मतदार कार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, व्यवसायाशी संबंधित प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे
PM Mudra Loan Yojana Online Apply In Marathi
केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून अगदी सहजपणे तुम्ही या कर्जाकरिता अर्ज करू शकता.
- प्रधानमंत्री मुद्रा कर्जाचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
- यानंतर तुम्हाला तीन प्रकारच्या कर्जाचे पर्याय मिळतील: शिशु, तरुण आणि किशोर कर्ज.
- आता तुम्हाला हवे असलेल्या कर्ज पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला अर्जाची लिंक दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट घ्यावी.
- हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हा अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि फॉर्मसोबत असलेली आवश्यक कागदपत्रे देखील जोडावी.
- हे सर्व केल्यानंतर तुम्ही आता तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन हा अर्ज सबमिट करा.
- बँक शाखेतील अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील आणि अर्ज व्यवस्थित भरलेला असल्यास, संपूर्ण दस्तऐवजे व्यवस्थित असल्यास, काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा केली जाईल.
पीएम मुद्रा लोन योजना | अधिकृत वेबसाईट |
कर्जाविषयी सविस्तर माहिती मिळवा | HOME PAGE |
मुद्रा लोन विषयी आणखी सविस्तर माहिती मिळवा | येथे क्लिक करा |
आधार कार्डवर मिळवा 20 हजार रुपये बिनव्याजी कर्ज! 5 मिनिटात पैसे खात्यामध्ये