महिलांनो…तुमच्या बँक खात्यामध्ये 7500 जमा होणार! ladki bahin Yojana fifth installment

ladki bahin Yojana fifth installment: महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचे जाहीर केले होते. महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये तीन हप्त्यांत जमा झाले होते. आता चौथा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये तर काही महिलांच्या खात्यात ७५०० रुपये जमा झाले आहेत. तुमच्या खात्यात किती पैसे आणि कधी जमा होतील हे जाणून घेणार आहोत.

तर महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत, तर काही महिलांच्या खात्यात थेट सात हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत. पण आता यापैकी तुमच्या खात्यात किती रुपये जमा होणार आणि कोणत्या तारखेला पैसे जमा होणार, हे जाणून घेऊया.

ladki bahin Yojana fifth installment
ladki bahin Yojana fifth installment

तर बघा, आता लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट चार हजार पाचशे रुपये, तर काही महिलांच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता लगेचच महिलांना चौथा आणि पाचवा हप्ता देखील मिळणार आहे. म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना नेमके किती पैसे मिळणार आहेत, हे जाणून घेणार आहोत.

3 हजार रूपये कुणाला मिळणार?

सरकारने असे सांगितले आहे की ज्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात (जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर) एकूण तीन महिन्यांचे पैसे मिळून चार हजार पाचशे रुपये जमा झाले होते. आता त्याच महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रितपणे म्हणजेच तीन हजार रुपये जमा होणार आहेत. यासोबतच, जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या महिलांना ऑगस्टमध्ये तीन हजार रुपयांचा लाभ मिळाला होता. त्यानंतर तिसऱ्या महिन्यात सुद्धा त्या महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा झाले होते. तर आता या महिलांना देखील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित मिळून तीन हजार रुपये दिले जाणार आहेत आणि हे पैसे त्यांच्या थेट बँक खात्यात जमा होतील.

7500 कुणाच्या खात्यात येणार?

तर आता बघा, ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला होता पण त्यांच्या खात्यात अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, अशा महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे पाच महिन्यांचे पैसे म्हणजेच 7500 रुपये एकत्रित मिळून जमा होणार आहेत. त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यासोबतच, सरकारने महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचवा हप्ता जमा केला आहे. त्यामुळे ज्या महिलांचे पैसे आले नाहीत, त्या महिलांच्या बँक खात्यात 10 ऑक्टोबरपर्यंत पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसातच आपले बँक पासबुक आणि बँक खाते बँकेत जाऊन तपासावे.

1500 रुपये मिळाले नसतील तर आताच हे काम करा! सविस्तर माहिती

LoanGiver
LoanGiver

कर्ज क्षेत्रातील असलेला विविध योजना, नवीन कर्ज अँप यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा माझा प्रयत्न आहे. या वेबसाईटवर तुम्हाला कर्जाबद्दल सर्व माहिती सोप्या भाषेत मिळेल. Contact Mail : [email protected]

Articles: 54

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *