SBI Poultry Loan : बरेच शेतकरी शेळ्या आणि मधमाश्या यांसारख्या प्राण्यांचा व्यवसाय करतात आणि ते अंडी आणि मांसासाठी कोंबडी सुद्धा पाळतात. पूर्वी लोक कोंबड्या स्वतःच्या अंगणात पाळत असत, पण आता शेतकरी मोठ्या जागेत मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करतात.
बऱ्याच शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध नाहीत. पोल्ट्री व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना देशातील मोठ्या बँका आता कर्ज पैसे देत आहेत. जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल पण तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील तर काळजी करू नका, स्टेट बँक तुम्हाला याबाबत मदत करू शकते. कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आपण पाहूया.
SBI Poultry Loan information in Marathi
घटक | माहिती |
कर्जाची रक्कम | 10 लाख रुपयांपर्यंत |
कर्जाचा कालावधी | घेतलेल्या कर्जावर आधारित असेल |
अर्ज लिंक | https://sbi.co.in/ |
पोल्ट्री व्यवसायासाठी कोंबड्यांचे संगोपन करणे ही चांगली आयडिया असू शकते कारण काही शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करताना त्यासाठी आवश्यक वातानुकूलित असलेले शेड वापरत आहेत. साधारण शेडमध्ये कोंबडी ठेवण्याच्या जुन्या पद्धतीपेक्षा हे नवीन शेड चांगले आहे.
नवीन तंत्रज्ञानाने पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल तर पैशांची जास्त गरज आहे. SBI बँक शेतकऱ्यांना पोल्ट्री कर्ज देऊन मदत करते, त्यामुळे आता इच्छुक लोक त्यांचा पोल्ट्री व्यवसाय सुरू करू शकतात आणि भरपूर पैसे सुद्धा कमवू शकतात.
पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी SBI लोकांना कर्ज देणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, तुम्हाला तुमचा स्वतःचा पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले पैसे कर्ज म्हणून देईल.
PM सूर्य घर योजने’चा लाभ घेण्यासाठी SBI देईल कर्ज, संपूर्ण माहिती वाचा
पोल्ट्री व्यवसाय SBI कर्ज पात्रता SBI Poultry Loan Eligibility
जर तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तो आधी कसा काम करतो हे जाणून घेणे किंवा पोल्ट्री व्यवसायाचा अनुभव घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही बँकेकडून पैसे घेतले आणि ते परत करू शकत नसाल तर तुम्हाला तुमची जमीन त्यांना सुरक्षा ठेव म्हणून द्यावी लागत असते जे बँक जप्त करू शकते. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या शेडपैकी काही शेडसाठी तुमच्याकडील पैसे वापरणे आवश्यक आहेत कारण बँक याची खात्री करत असते.
कागदपत्र:
- भरलेला अर्जासह मतदान कार्ड
- पॅनकार्ड
- पासपोर्ट
- आधारकार्ड
- वाहनचालक परवाना
- रहिवाशी पुराव्यासाठी मतदान कार्ड
- पासपोर्ट
- आधारकार्ड
- वाहन चालक परवाना इत्यादी.
SBI Poultry Loan या कर्जासाठी अर्ज कुठे करावा?
पोल्ट्री फार्म सुरू करायचा असेल तर तुम्हाला SBI बँकेत जाऊन तिथल्या लोकांशी बोलायला हवं. ते तुम्हाला काय करायचे आहे हे समजण्यात मदत करतील. त्यानंतर, तुम्हाला तुमच्या पोल्ट्री फार्मसाठी एक प्लॅन बनवून घ्या आणि तो बँकेला सबमिट करा .
हा प्लॅन तुम्हाला पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी किती पैशांची आवश्यकता आहे हे दर्शवेल. बँकेला तुमचा हा प्लॅन आवडला तर ते तुम्हाला लगेच कर्ज मंजुरी देतील आणि तुमच्या खात्यात पैसे टाकतील.
पोल्ट्री व्यवसायसाठी १० लाखापेक्षा जास्त कर्ज पाहिजे असेल तर काय करावे?
स्टेट बँक सोडून, नाबार्ड नावाची दुसरी संस्था देखील तुम्हाला पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी कर्ज देऊ शकते. यात तुम्हाला 27 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, तुम्ही नाबार्डच्या वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता
Plush help mi sir