KCC Loan in 5 Minutes: आम्ही तुमच्यासाठी अत्यंत कामाची माहिती या पोस्टद्वारे घेऊन आलो आहोत. नाबार्ड आणि आरबीआय यांच्यात एक महत्त्वपूर्ण करार झाला आहे. शेतकऱ्यांना आता अवघ्या ५ मिनिटांत कर्ज मिळणार असून त्यांना कर्जाचा थेट लाभ मिळणार आहे. नाबार्ड आणि RBI मधील भागीदारी करार काय आहे? आपण या पोस्टद्वारे माहिती जाणून घेऊया.
शेतकऱ्यांना आता कर्ज मिळवणे सोपे जाईल, कारण त्यांना बँकेकडून पैसे कर्ज मिळवण्यासाठी 3 ते 4 आठवडे थांबावे लागणार नाही. त्याऐवजी, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ची शाखा RBIH यांच्यात झालेल्या करारामुळे ते आता फक्त 5 मिनिटांत कर्ज घेऊ शकतात.
KCC Loan in 5 Minutes किसान क्रेडिट कार्ड योजना
कर्ज योजनेचे नाव | किसान क्रेडिट कार्ड योजना (KCC Loan in 5 Minutes) |
द्वारे सुरु | केंद्र सरकार |
कर्ज देण्याचे उद्देष | 4 टक्के कमी व्याजदराने 3 लाखांपर्यंत कर्ज |
अधिकृत वेबसाईट | https://pmkisan.gov.in/ |
भारतासारख्या कृषीप्रधान देशातील शेतकऱ्याला कर्जाची गरज असल्यास, त्यांना बँकेकडे अर्ज केल्याच्या चार ते पाच आठवड्यांच्या आत कर्ज दिले जात असते, पण, अलीकडील झालेल्या करारामुळे शेतकऱ्यांसाठी कर्ज मंजुरीची प्रक्रिया केवळ 5 मिनिटांपर्यंत (KCC Loan in 5 Minutes) कमी झाली आहे. हा बदल आरबीआय आणि सहभागी दोन्ही पक्षांमधील करारामुळे शक्य झालेला आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय आहे? KCC Loan in 5 Minutes Yojana
1998 मध्ये नाबार्डने सुरू केलेली किसान क्रेडिट कार्ड योजना हि भारत सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा कृषी, मत्स्यपालन आणि पशुपालन क्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा करणे हा आहे. हि योजना शेतकरी वर्गाला उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि विविध खर्च कव्हर करण्यासाठी अल्पकालीन कर्ज आणि क्रेडिट मर्यादा मिळविण्यात मदत करते.
सर्व शेतकरी, मग ते जमिनीचे स्वतः मालक असोत किंवा भाडेतत्त्वावर जमीन घेतलेले शेतकरी असोत, KCC साठी अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. याशिवाय, 2018-19 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेचा लाभ पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनात गुंतलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आदेश दिला गेला आहे.
किसान क्रेडिट कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याची संधी आहे. शिवाय, सरकार काही सवलतींसह व्याजावर 2 टक्के सबसिडी देते. याव्यतिरिक्त, जर एखाद्या शेतकऱ्याने व्याजाची रक्कम त्वरित भरली तर ते सरकारकडून अतिरिक्त 3 टक्के अनुदानास पात्र ठरतात. यामुळे, एकूण व्याजदर प्रभावीपणे 4 टक्के कमी होतो.
KCC ने पुरविलेल्या कर्ज मदतीमुळे शेतकऱ्यांवर आता पारंपरिक बँकांच्या कर्जावरील उच्च व्याजदराचा बोजा कमी होणार आहे. KCC कर्जाचे व्याज दर सरासरी 4% पासून सुरू होतात आणि ते 2% इतके कमी असतात. शिवाय, हि योजना शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी विशिष्ट पीक चक्रानुसार मदत करते.
किसान क्रेडिट कार्डचा वापर विविध बँकांमध्ये कर्ज घेण्यास केला जाऊ शकतो. हे क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांच्या जमिनीच्या धारणेनुसार तयार केलेली आहेत आणि बियाणे, खते आणि कीटकनाशके यासारख्या कृषी निविष्ठांची खरेदी सुलभ करण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पादनाच्या गरजांसाठी रोख रक्कम सहज उपलब्ध करून देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.
किसान क्रेडिट कार्ड पात्रता KCC Loan in 5 Minutes Yojana Eligibilty
जे शेतकरी शेतीशी निगडित आहेत, मग ते जमीन मालक असोत किंवा इतरांच्या मालकीच्या जमिनीवर काम करत असोत, ते KCC अर्ज करण्यास पात्र असतील. कर्ज परतफेडीच्या वेळी अर्जदाराचे वय 18 ते 75 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय ६० पेक्षा जास्त असल्यास, दुसऱ्या सह-अर्जदार अर्जामध्ये समाविष्ट करणे आवश्यक असेल.
किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी 9 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकतात. केंद्र सरकार या दरावर 2 टक्के कपात देणार आहे आणि वेळेवर परतफेडीसाठी अतिरिक्त 3 टक्के कपात ऑफर सुद्धा दिली जाणार आहे. परिणामी, किसान क्रेडिट कार्डचा वापर करून शेतकरी 4 टक्के कमी व्याजदराने कर्ज घेऊ शकतात. कार्डसाठी अर्ज करताना, शेतकऱ्यांनी त्यांच्यावर सुरु असलेली शेती कर्जे बँकेकडे सांगणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे :
- या योजनेचा पूर्ण भरलेला अर्ज
- ओळखपत्र- पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- पत्ता पुरावा- पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- जमिनीची कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
KCC मधून ५ मिनिटांत कर्ज मिळण्यासाठी अर्ज कसा करावा? KCC Loan in 5 Minutes Apply
या योजनेचा एक भाग म्हणून सरकारने किसान क्रेडिट कार्डसाठी थेट PM-किसान योजनेच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज पीडीफ उपलब्ध करून दिली आहे.
हि अर्ज पीडीफ डाउनलोड करण्यासाठी, Google मध्ये “PM किसान” टाईप करून सर्च करा. पुढे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वेबसाइट एक नंबरवर दिसेल. वेबसाइटच्या वरच्या उजव्या कॉर्नरला KCC फॉर्म पीडीफ डाउनलोड करण्याचा पर्याय असेल आणि क्रेडिट कार्डसाठी फॉर्म डाउनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक करा.
क्रेडिट किसान कार्डचा अर्ज या पेजवर तुम्हाला पाहता येईल. अर्जाचे शीर्षक “PM-KISAN आहे. त्यानंतर, अर्जाच्या भाग A च्या पुढील भागावर “कार्यालयीन वापरासाठी” असे लेबल आहे बँक या विभागातील माहिती भरेल. शेतकऱ्यांना या विभागात कोणतीही माहिती देण्याची गरज नाही.
त्या खालील विभागात, तुम्हाला अर्ज करायचा असलेल्या किसान क्रेडिट कार्ड कर्जाच्या प्रकारासंबंधी माहिती भरा, मग ते नवीन KCC असो, कि जुने कार्ड असो, किंवा पूर्वी बंद केलेले किसान क्रेडिट कार्ड पुन्हा सक्रिय करणे असो. तुम्हाला किती पैसे कर्ज घ्यायचे आहे ते तिथे भरून घ्यावेच लागेल.
पुढे, सेक्शन सी मध्ये, तुम्ही अर्जदाराचे नाव, पीएम-किसान सन्मान योजनेचा निधी ज्या बँक खात्यात जमा केला जात आहे, तो खाते क्रमांक आणि तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा निवडायचा आहे की नाही हे भरणे आवश्यक आहे. कृपया संबंधित बॉक्समध्ये ‘होय’ वर खूण करून घ्या.
जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) किंवा तुमच्या स्थानिक सरकारी सेवा केंद्रामार्फत ते करणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्डसाठी अर्ज प्रक्रिया केंद्रावरच केली जाणे आवश्यक आहे आणि लक्षात घ्या या सेवेसाठी शेतकऱ्यांना निश्चित शुल्क द्यावे लागेल.
शेतकऱ्याने दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर, अर्ज स्वीकारला जाईल आणि किसान सन्मान निधी योजनेची रक्कम शाखेच्या लॉगिनशी जोडलेल्या बँक खात्यावर पाठवली जाईल. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना 15 दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्ड मिळून जाईल.
कार्ड काढताच ५ मिनिटांत मिळणार अॅग्री लोन KCC Loan in 5 Minutes
भागीदारी करारावर नाबार्डचे अध्यक्ष राजेश बन्सल आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वाक्षरी केली. बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, या करार भागीदारीचे उद्दिष्ट कर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि देशातील 12 कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटप करण्यासाठी लागणारा वेळ तीन ते चार आठवड्यांवरून केवळ पाच मिनिटांपर्यंत कमी करणे हे आहे असे ते म्हणाले.
या माध्यमातून कर्ज देण्याची कार्यक्षमता सुधारणार आहे, शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज मिळू शकणार आहे. तसेच देशातील बारा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा आणि या कराराचा फायदा या ठिकाणी होऊ शकतो, असा अंदाज आहे.
KCC Loan अर्ज कुठून डाउनलोड करावा?
हि अर्ज पीडीफ डाउनलोड करण्यासाठी, Google मध्ये “PM किसान” टाईप करून सर्च करा. पुढे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वेबसाइट एक नंबरवर दिसेल. वेबसाइटच्या वरच्या उजव्या कॉर्नरला KCC फॉर्म पीडीफ डाउनलोड करण्याचा पर्याय असेल आणि क्रेडिट कार्डसाठी फॉर्म डाउनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक करा.