PM सूर्य घर योजने’चा लाभ घेण्यासाठी SBI देईल कर्ज, संपूर्ण माहिती वाचा (SBI Solar Panel Loan)

Join Our WhatsApp Group Join Group!
Follow Our Instagram Page Follow Now!

SBI Solar Panel Loan : सरकारने नुकतीच पीएम सूर्य घर मोफत वीज हि योजना सुरु केलेली आहे. या योजनेमधून सरकारला देशातील एक कोटी कुटुंबांना मोफत वीज देण्याचे उद्देष आहे. म्हणजे आता लोकांना दरमहा ठराविक रकमेपर्यंत विजेचे बिल भरावे लागणार नाही. यासाठी, SBI त्यांना सोलर पॅनेल कर्ज मिळविण्यात मदत करणार आहे.

तुम्ही आता सोलर पॅनेलसाठी 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळवू शकतात, ज्यामुळे तुमच्या वीज बिलावर तुम्ही जास्तीचे पैसे वाचू शकाल.

आपल्या माहीतच आहे सोलर पॅनेल खरंच महाग असतात, प्रत्येकजण ते आपल्या घरावर बसवू शकत नाही. म्हणूनच आता तुमच्याकडे पैसे कमी असले तरी SBI कडून कर्ज घेऊन सोलर पॅनल बसवू शकाल.

SBI Solar Panel Loan
SBI Solar Panel Loan

SBI Solar Panel Loan PM सूर्य घर योजना कर्ज थोडक्यात माहिती

उद्देश3 किलोवॅट पर्यंत सोलर रूफ टॉप बसवणे 3 किलोवॅट पेक्षा जास्त आणि 10 किलोवॅट पर्यंत सोलर रूफ टॉप बसवणे 
कर्जाची रक्कमकर्जाची कमाल रक्कम 2 लाख रुपयेकर्जाची कमाल रक्कम 6 लाख रुपये
कर्ज कालावधी कमाल १२० महिने (मोरेटोरियम कालावधीसह) (प्री-पेमेंट दंड नाही) 
अर्ज लिंक अर्ज करण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in वर नोंदणी करायशस्वी नोंदणीनंतर, कृपया https://www.jansamarth.in वर अर्ज करा.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत, तुम्ही तुमच्या घरच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांपर्यंत आणि 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळवू शकता. या योजनेचा उद्देश लोकांना घरामध्ये सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे आहे, ज्यामुळे वीज बिलावरील पैसे वाचविण्यात त्यांना मदत होईल. तुम्ही सोलर पॅनल वापरून तयार केलेली अतिरिक्त वीज वीज तुम्ही वीज कंपनीला विकून अतिरिक्त पैसे कमवू शकता.

सोलर पॅनल कर्ज पात्रता SBI Solar Panel Loan Eligibility

SBI कडून कर्ज मिळवण्यासाठी, तुमचे ठराविक उत्पन्न असणे आवश्यकआहे. परंतु जर तुम्हाला लहान सोलर पॅनल बसवायचे असेल तर तुम्हाला हि अट लागू होणार नाही. तथापि, जर तुम्हाला मोठे सोलर पॅनल बसवायचे असेल, तर तुमचे कर्ज मिळवण्यासाठी वर्षाला किमान 3 लाख रुपये उत्पन्न असणे आवश्यक आहे.

घटक पात्रता अटी (3 KW पर्यंत)पात्रता अटी(> 3 KW ते 10 KW)
पॅन कार्ड CIBIL पॅन पर्यायी असेल पॅन अनिवार्य असेल 
मार्जिनप्रकल्प खर्चाच्या किमान 10%प्रकल्प खर्चाच्या किमान 20%
व्याज दर EBLR – 2.15% प्रभावी दर: 7% गृहकर्ज ग्राहकांसाठी EBLR + 0% प्रभावी दर – 9.15%नॉन-होम लोन ग्राहकांसाठी EBLR + 1% प्रभावी दर – 10.15%
सुरक्षा ठेव मालमत्तेचे हायपोथेकेशन
प्रक्रिया शुल्कNIL
अनुदान रक्कम 1KW – Rs. 300002KW – Rs. 600003KW – Rs. 78000Rs. 78000
आवश्यक वार्षिक उत्पन्नआवश्यकता नाहीकिमान 3 लाख रुपये

पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत लोक त्यांच्या घरात सोलर पॅनेल बसवू शकतात. पॅनल्सची किंमत ते किती वीज बनवू शकतात यावर अवलंबून असते. एक किलोवॅट वीज बनवणाऱ्या छोट्या पॅनेलची किंमत ३०,००० रुपये आहे. दोन किलोवॅट्स बनवणाऱ्या मोठ्या पॅनेलची किंमत 60,000 रुपये आहे. आणि तीन किलोवॅटपेक्षा जास्त बनवणाऱ्या मोठ्या पॅनेलची किंमत ७८,००० रुपये आहे.

कागदपत्रे :

  • 1) आधार कार्ड
  • 2) वोटर आयडी कार्ड
  • 3) इलेक्ट्रिसिटी बिल
  • 4) स्वतःचं घर असल्याचा पुरावा
  • 5) रेशन कार्ड
  • 6) बँक खाते पासबुक

SBI Solar Panel Loan Process in Marathi कर्जासाठी अर्ज कुठे करावा?

तुमच्या घराजवळच्या SBI शाखेत जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला याबाबत आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही ऑफिसिअल वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता.

कर्जासाठी अर्ज करा

  • सुरुवातीला, https://pmsuryaghar.gov.in या ऑफिसिअल वेबसाइटला भेट द्या आणि रूफटॉप सोलरचा ऑपशन निवडून घ्या.
  • तुमचे राज्य आणि तुमच्या वीज वितरण कंपनीचे नाव निवडून घ्या, तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाइल नंबर आणि ईमेल टाकून पुढे जा.
  • नवीन पेजवर तुमचा ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर देऊन लॉग इन करा.
  • फॉर्म उघडल्यानंतर, रूफटॉप सोलर पॅनेलसाठी अर्ज करण्यासाठी त्यात दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करा.
  • एकदा तुम्ही हा अर्ज पूर्ण केल्यानंतर, अर्ज मंजूर केली जाईल आणि त्यानंतर तुम्ही कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनल बसू शकाल. आणि कर्जासाठी अर्ज करू शकतात.

सोलर पॅनलसाठी जास्तीत जास्त किती अनुदान मिळते?

घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार जास्तीत जास्त ७८ हजार अनुदान देते.

सोलर पॅनेलची SBI किती कर्ज देते? SBI Solar Panel Loan Amount

सोलर पॅनेलसाठी SBI जास्तीत जास्त 6 लाख रुपये कर्ज देते.

तुमच्या मित्रांना ही पोस्ट नक्की शेअर करा
LoanGiver
LoanGiver

कर्ज क्षेत्रातील असलेला विविध योजना, नवीन कर्ज अँप यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा माझा प्रयत्न आहे. या वेबसाईटवर तुम्हाला कर्जाबद्दल सर्व माहिती सोप्या भाषेत मिळेल. Contact Mail : [email protected]

Articles: 61

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *